- कासारवाडीतील घटना, प्रियकरास पोलिसांकडून अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२०) :- कासारवाडीतील महिला पतीपासून विभक्त राहत होती. दरम्यान आरोपीचे आणि मयत महिला यांचे प्रेमसंबंध जुळले. ते दोघे लग्न करणार होते. त्यांच्या नवीन नात्याला मयत महिलेच्या आई आणि भावाची संमती होती. त्यामुळे ते दोघे एकत्र राहत होते. आरोपी हा लग्नासाठी आग्रह करीत होता. त्यास महिला नकार देत होती. त्यामुळे महेश याने चारित्र्यावर संशय घेऊन राहत्या घरात तिचा गळा आवळून खून केला.
ही घटना मंगळवारी (दि. १९) रोजी रात्री साडेदहा वाजता भीमराव जवळकर चाळ, कासारवाडी येथे घडली. याबाबत मयत महिलेच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिचा प्रियकर महेश मल्हारी खंडागळे (वय २८, रा. भीमराव जवळकर चाळ, कासारवाडी. मूळ रा. एकुंडी, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.















