न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरात ४५ भाग कंटेन्मेंट झोन असून, सदर भाग सील करण्यात आला आहे. त्या भागावरील निर्बंध कायम असून, रहिवाशांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे.
शहरातील सील केलेले भाग पुढीलप्रमाणे :-
खराळवाडी – शिवनेरी कॉलनी, पिंपळे गुरव, रुपीनगर, गंधर्वनगरी, मोहननगर, दिघी, तपोवन रोड परिसर, पिंपरीवाघेरे, सोळा नंबर बसस्टॉप परिसर, वाकड, शिवाजी चौक परिसर, पिंपळे निलख, तनिष्क आयकॉन-दिघी, जगताप कॉम्प्लेक्स परिसर-पिंपळे गुरव, मधुबन सोसायटी-सांगवी, इंदिरानगर झोपडपट्टी -चिंचवड, साठेनगर-चऱ्होली, शुभश्री सोसायटी -पिंपळे सौदागर, विनायकनगर-पिंपळे गुरव. बनकरवस्ती परिसर-मोशी, बजाज शाळा परिसर-संभाजीनगर, तळवडे-वूड्स व्हिले, मोशी, काळेवाडी परिसर, ताम्हणेवस्ती, तापकीर चौक-काळेवाडी, निकमवस्ती चऱ्होली, लांडगेनगर- भोसरी, कस्पटे वस्ती-वाकड, दत्तनगर-थेरगाव, गुरुविहार कॉलनी-भोसरी, हुतात्मा चौक-भोसरी, छत्रपती चौक-रहाटणी, आनंद नगर-चिंचवड स्टेशन, चक्रपाणी वसाहत-भोसरी, पवनानग- सांगवी, शुभश्री सोसायटी-आकुर्डी, फुगेवाडी, तांबे शाळा- रहाटणी, किवळे, पिंपळे सौदागर, दिघी, भोसरी, भाटनगर-पिंपरी, अलंकापुरी रोड-भोसरी, क्षितिज विंग-भोसरी हे भाग सील आहेत.
तर, २७ परिसरातील कंटेन्मेंट झोन उठविण्यात आले आहेत.















