न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२०) :- दोन महिन्यांपासून बंद असलेली पीएमपीएमएलची बस सेवा उद्या (मंगळवार) पासून पुन्हा सुरू होणार आहे. यासाठी पीएमपीएलने नियमावली बनवली आहे. त्यानुसार १० वर्षांखालील लहान मुले आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना बसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच बसमध्ये क्षमतेच्या ५० टक्के म्हणजेच फक्त २१ प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे. तशा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पीएमपीएल प्रशासनाबरोबर बैठक घेत बस सुरू करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार पीएमपीएल प्रशासनाने बस सुरू करण्याबाबतची नियमावली आणि मार्ग निश्चित करून बस सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. सध्या पिंपरी-चिंचवड शहर आणि एमआयडीसी परिसरात पीएमपीची सेवा सुरु होणार आहे. त्यामुळे शहर आणि एमआयडीसी परिसरातील ३० मार्गांवर पीएमपीच्या बस धावणार आहेत. पीएमपीच्या निगडी, भोसरी व पिंपरी डेपोतून या बसचे नियोजन करण्यात येणार आहे. सकाळ आणि संध्याकाळी दोन पाळ्यात बस धावणार आहेत. केवळ २१ प्रवासीच असणार आहेत. एकाआड एक प्रवासी बसतील.
निगडी डेपो (निगडी – नवलखा उंबरे, डांगे- चौक – हिंजवडी माण फेज ३, आकुर्डी रेल्वे स्टेशन – चिखली, निगडी – चऱ्होलीगाव, आळंदी, वडगाव मावळ -चाकण, निगडी – देहूरोड, निगडी – भोसरी, निगडी – कामशेत, निगडी – चाकण, निगडी – हिंजवडी माण फेज 3, चिखली – हिंजवडी माण फेज 3), भोसरी डेपो (आळंदी – देहूगाव, भोसरी – हिंजवडी माण फेज 3, आळंदी – जांबे, भोसरी – राजगुरूनगर, भोसरी – चाकण, भोसरी – आळंदी, पिंपरी डेपो, भोसरी – म्हाळुंगे एमआयडीसी, पिंपरीगाव – भोसरी, चिंचवडगाव – भोसरी, पिंपरीगाव – चिखली, हिंजवडी माण फेज 3 – आळंदी, चऱ्होलीगाव – रहाटणीमार्गे चऱ्होलीफाटा, भोसरी – रहाटणीगाव, डांगे चौक – जांबे, नेरे दत्तवाडी, चिखली – डांगे चौक, वायसीएम हॉस्पिटल – आळंदी, भोसरी – हिंजवडी माण फेज 3, चिंचवडगाव – चांदखेड) या मार्गावरच या बसेस थांबतील.













