न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२०) :- बोपखेल गावात हातावर पोट असणारे गोरगरीब, कष्टकरी यांची संख्या जास्त आहे. कोरोनामुळे त्यांच्या जनजीवनावर अतिशय विपरीत परिणाम झालेला आहे. बोपख़ेल गावातील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग तात्या घुले पाटिल यांनी यांनी पुढाकार घेत, ‘मदत नव्हे तर कर्तव्य’ हा उपक्रम हाती घेतला.
या उपक्रमाद्वारे नागरिकांना धुवून परत वापरता येतील असे ३३०० कापडी मास्कचे वाटप केले. लॉकडाऊनच्या ४ टप्पांमध्ये जवळपास गरजू ३५० कुटुंबाना तांदुळ, तेल, तूरडाळ, मसाला या रेशन कीटचे वाटप केले.
गेल्या ४१ दिवसांपासून बोपखेल गावठाण, रामनगर, गणेशनगर परिसरात दररोज सरासरी ३०० लोकांना दाळ-खिचडीचे वाटप चालू आहे. हे करताना परिसरातील छोट्या मुलांच्या आग्रहास्तव पांडुरंग घुले पाटिल यांनी १२०० वडापाव, १००० इडली-चटनी, ५०० डोसे-भाजी, २००० भेळ पाकीट आणि १८०० लोकांना चिकन बिर्यानीचे वाटप केले आहे. लॉक डाऊनच्या काळात पांडुरंग तात्या घुले पाटिल यांच्या मदतीमुळे गरजूंना दिलासा मिळाला आहे.











