न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापौर उषा उर्फ माई ढोरे या प्रभावीपणे उपाययोजना करीत आहेत. महापौरांच्या प्रभावी उपाय योजनांमुळे पिंपरी-चिंचवड शहर रेडझोन मधून बाहेर आले. ठप्प पडलेले शहर पुन्हा नव्याने सुरु झाले आहे.
गुजरातच्या नमो ग्रुप फाउंडेशनने महापौर ढोरे यांच्या कार्याने प्रभावित होऊन, त्यांच्या कार्याची दखल घेत, त्यांना प्रशस्तीपत्रक देवून त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान केला आहे.
यावेळी नमो ग्रुप फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद परदेशी, नमो ग्रुप फाउंडेशन महामंत्री (महाराष्ट्र राज्य) साईभाऊ कोंढरे, नमो ग्रुप फाउंडेशन पुणे शहर अध्यक्ष ओंकार डवरी, यश तावरे, निखिल निकुंभ, हेमंत डवरी आदी मान्यवर उपस्थित होते.











