न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
आज सकाळी महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती संतोष लोंढे ,सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
नेहरूनगर येथील भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नगरसद्स्य राहुल भोसले, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.











