न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे. २०२०) :- कोरोना साथीच्या रोगामुळे हाताचे काम गेले आणी जगायचे कसे असा प्रश्न कामगारांना पडला आहे. कामावर जाण्यासाठी कामगारांना वाहन उपलब्ध नाही, दुचाकी वापरु शकत नाही. अशा स्थितीत दिलासा म्हणून विविध संस्थाच्या वतीने स्वच्छता कामगार, फेरीवाला, घरेलू कामगार, कंत्राटी कामगार, बांधकाम कामगार यांना पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या हस्ते सायकलींचे वितरण करण्यात आले.
सायल टू वर्क, पुणे सायकल वेरनेस, निसर्ग सायकल मित्र, भद्रायराजते प्रतिष्ठाण, ग्रीन सायकल क्लब, युलू बाईक्स व कष्टकरी संघर्ष महासंघ तसेच सायकल महापौर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोगित तत्वावर कष्टकरी तसेच कोव्हीड योध्यांना मोफत सायकल प्रदान करण्यात आल्या. सध्या प्रातिनिधिक स्वरूपात १५ सायकलींचे मोफत वितरण करण्यात आले आहे. २०० कामगारांनी सायकलसाठी नोंदणी केली आहे.
याप्रसंगी आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक एकनाथ पवार, कष्टकरी संघर्ष महासंघाचे काशिनाथ नखाते, अभिजीत कुपटे, सुनील पाटील, सतीश नाजरे, विनीत पाटील, महिला आघाडीच्या माधुरी जलमुलवार, राजेश माने, उमेश डोर्ले, सखाराम केदार आदी उपस्थित होते.