न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२०) :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नागरिकांना मास्क लावण्याचे आवाहन केले आहे. परंतु अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यांच्यावर महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. ग क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्र. २४ मधील डांगे चौक येथे मास्क न लावणाऱ्या २०० जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई ग क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य आरोग्य निरीक्षक राजू बेद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक २४ चे आरोग्य निरीक्षक एस. बी. चन्नाल, आरोग्य मुकदम दिलीप खताळ, कर्मचारी अभय दारोळे, प्रशांत पवार, अरुण राऊत, राजू जगताप, सूर्यकांत चाबुकस्वार, वजीर सौदागर यांच्या पथकामार्फत करण्यात आली.