न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१. जून. २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जयंतीनिमित्त त्यांचे महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीतील प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे हस्ते पुष्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्या आशा धायगुडे शेंडगे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, उपअभियंता विजय भोजने, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक हे उपस्थित होते.
मोरवाडी, पिंपरी येथील अहिल्याबाई होळकर यांचे पुतळ्यास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे हस्ते पुष्षहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्या आशा धायगुडे शेंडगे, माजी नगरसदस्य राजू दुर्गे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
सांगवी येथेही महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी अहिल्याबाई होळकर यांचे पुतळ्यास पुष्षहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते