न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१. जून. २०२०) :- टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यात करोनाच्या लाल क्षेत्रातील मुंबई महानगर, पुणे, नागपूरसह १८ महापालिकांमधील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा देण्यात आला आहे. ५ जूनपासून या शहरांमध्ये दुकाने टप्प्याटप्प्याने सुरू होतील. राज्यातील टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यासाठी सरकारच्या वतीने ‘पुन्हा सुरुवात’ (मिशन बिगीन अगेन) या नावाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली. तीन टप्प्यांमध्ये ३ जून, ५ जून आणि ८ जून अशा तीन तारखांना टाळेबंदी शिथिल केली जाईल. प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करण्याचे अधिकार महापालिका क्षेत्रांत आयुक्तांना, तर अन्य भागांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना असतील.
बुधवारपासून हे सुरू..
’सार्वजनिक व खासगी मैदाने, सार्वजनिक ठिकाणे, समुद्रकिनारे, उद्याने या ठिकाणी अंतरनियम पाळून व्यायाम, जॉगिंग, धावणे, सायकल चालविण्यास परवानगी. पहाटे ५ ते सायंकाळी ७ पर्यंत ही सवलत. मात्र, सामूहिक व्यायाम किंवा बंदिस्त प्रेक्षागृहात व्यायाम किंवा अन्य कोणत्याही कसरती करण्यास प्रतिबंध कायम.
’प्लबंर, विद्युतदुरुस्ती, पेस्ट कंट्रोल, तंत्रज्ञ यांना सर्व नियम पाळून कामे करण्यास परवानगी.
’गॅरेज आणि वर्कशॉपमध्ये वेळ घेऊन गाडी दुरुस्तीची मुभा.
’सर्व शासकीय कार्यालये आवश्यकतेनुसार १५ टक्के किं वा कमीत कमी १५ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरू करण्यास परवानगी.
रविवारपासून वृत्तपत्रे घरपोच
’ मॉल आणि व्यापारी संकुले वगळताअन्यत्र दुकाने सुरू करता येतील.
’ सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास मान्यता. दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उघडी ठेवता येतील.
’ दुकाने पी-१ व पी-२ यानुसार उघडणार. म्हणजेच सम आणि विषमचा उपयोग के ला जाईल.
’ कपडय़ांच्या दुकानांमध्ये कपडे घालून बघता (ट्रायल रूम) करता येणार नाही. कपडे बदलणे किंवा परत करता येणार नाहीत.
’ खरेदीसाठी नागरिकांनी चारचाकी किं वा दुचाकीचा वापर करू नये. चालत किं वा सायकलच्या माध्यमातून खरेदी करावी.
’ अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी लांब प्रवास करू नये.
’ मोटारीचा वापर करू नये.
’ अंतरनियम पाळले गेले नाही वा जास्त गर्दी झाल्यास प्रशासनाकडून तात्काळ दुकाने बंदके ली जातील.
८ जूनपासून खासगी कार्यालयांमध्ये १०% उपस्थिती परवानगी
’ सर्व खासगी कार्यालयांमध्ये एकूण क्षमतेच्या १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मान्यता देण्यात येईल.
’ उर्वरित कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करावे.
’ खबरदारीचे सारे उपाय योजणे व्यवस्थापनावर बंधनकारक.
दुचाकी आणि चारचाकी वाहने
दुचाकी – फक्त चालक. तीनचाकी – चालक अधिक दोन प्रवासी
चारचाकी – चालक अधिक दोन प्रवासी
मुंबई, पुणे, ठाणे या १८ महापालिकांमध्ये दुचाकी किंवा चारचाकी या अत्यावश्यक असतील तरच वापरता येतील.
३० जूनपर्यंत हे बंदच
केशकर्तनालये, ब्यूटिपार्लर, स्पा, उपाहारगृहे ३० जूनपर्यंत बंदच राहतील. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, खासगी शिकवण्यांवरील निर्बंधही कायम आहेत. आंतरराष्ट्रीय विमान सेवा, मेट्रो रेल्वे, उपनगरीय रेल्वे सेवा, मॉल्स, चित्रपटगृहे, बार, धार्मिक स्थळे, तरणतलाव, व्यायामशाळा, मनोरंजन केंद्रे ३० जूनपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहेत.
ई-पास बंधनकारक
आंतरजिल्हा प्रवासी सेवेला परवानगी आंतरजिल्हा व आंतरराज्य प्रवासाकरिता ई-पास किं वा पूर्वपरवानगी आवश्यक. म्हणजेच मुंबईतून पुण्याला जाण्यासाठी ई-पास काढणे बंधनकारक.
मजुरांचे स्थलांतर किंवा श्रमिक रेल्वेने प्रवासाकरिता सरकारी यंत्रणांची परवानगी आवश्यक