- राष्ट्रवादी व शिवसेनेच्या आघाडीकडून भाजपला जोरदार धोबीपछाड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२०) :- लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून तहकूब असणारी पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा आज सोमवारी महापालिकेच्या दालनात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे या होत्या. मात्र, आजची सभा नागरिकांच्या नाही तर, नगरसेवकांच्या विशेष हाणामारीने चांगलीच गाजली.
महापालिकेची सभा संपल्यानंतर शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे व राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी भाजपचे नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांना मारहाण केली. मारहाण एवढी जबर होती की, मडिगेरी यांना थेट रुग्णालयात भर्ती व्हावे लागले. स्वतः महापौर माई ढोरे यांना मडिगेरी यांची सुटका करावी लागली. ही घटना आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास महापालिकेत घडली. मात्र, कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
या तिघांमध्ये बोलण्यातून वाद झाला आणि राहुल कलाटे व मयूर कलाटे या चुलत बंधूंनी विलास मडिगेरी यांना मारहाण केली. त्यांना धक्काबुक्की केली.
याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे, अशी सूत्रांकडून माहिती समजली.
विलास मडिगेरी यांना आम्ही कुठलीही मारहाण केलेली नाही. फक्त शाब्दिक बाचाबाची झाली. विलास मडिगेरी हेच आमच्या अंगावर धावून आले. विलास मडिगेरी हे पालिकेच्या खासगी जमीन वाटाघाटीसंबंधी स्थानिक शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी करतात. पिंपरी चिंचवड कर्मचा-यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून महत्वाची असणारी धन्वंतरी योजना बंद करुन ती विमा स्वरुपात आणण्याचा विषय आहे. यात विविध विमा कंपन्यांना पुढे करून, त्या कंपन्यांकडून मडिगेरी पैसे मागतात. त्यामुळे सर्वांची बदनामी होत आहे.
– राहुल कलाटे (शिवसेना गटनेता)
– मयूर कलाटे (राष्ट्रवादी नगरसेवक)