न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून. २०२०) :- पत्राशेड व राहते घर तोडून आतील पावणे दहा लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले. तसेच, शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघा तरुणांसह तब्बल पन्नास जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकरवाडी येथील डायची कंपनीसमोर गुरुवारी (दि. ४) रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी निलेश अंकुश लांडे (वय २८) आणि अमोल अंकुश लांडे (वय २५, दोघे रा. कासारवाडी) यांना पोलिसांनी अटक केली.
आशुतोष चंद्रभान यादव याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. यादव हे भाडेतत्वावर राहात होते. गुरुवारी रात्री बारा वाजता जागा मालकाचे नातू लांडे ५० जणांचा जमाव घेऊन आले. फिर्यादी यांच्या पत्नी, मुलांना शिवीगाळ करून घराबाहेर काढले. त्यानंतर जेसीबीच्या साहायाने घर व पत्रा शेड पाडून टाकले. घरातील सोन्या – चांदीच्या वस्तू, ६ लाख ९ हजारांचे तांबे, पितळ, चहाची टपरी असा ९ लाख ७७ हजारांचा ऐवज चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून दोघांना अटक केल्याची माहिती भोसरी पोलिसांनी दिली.














