न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०२०) :- २९ मे रोजी फिर्यादी राहुल त्यांच्या दुचाकीवरून (एमएच १४ एफडब्ल्यू ३०५६) काळेवाडी येथून जात होते. कुणाल हॉटेलजवळ आले असता त्यांना चक्कर आली. त्यामुळे त्यांनी दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेतली आणि थोडा वेळ फूटपाथवर बसले.
त्यावेळी तिथे आरोपी साहिल आला. त्याने राहुल यांच्या पोटात लाथ मारली. राहून यांनी साहिल याला विरोध केला असता साहिल याने राहुल यांना हाताने मारहाण करत ७० हजारांची होंडा शाईन दुचाकी, पाच हजारांचा मोबाईल फोन आणि साडेसहा हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ८१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
साहिल उर्फ पोट्ट्या दीपक सूर्यवंशी (वय १८, रा. रहाटणी फाटा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी राहुल बाबासाहेब कुंभार (वय ३२, रा. चिंचवडेनगर) यांनी शनिवारी (दि. ६) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.











