न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जून. २०२०) :- नँशनल सोशालिस्ट पार्टी, चित्रपट कामगार आघाडीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी शिवराज सिन्हा ह्यांची निवड करण्यात आली आहे. पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू घोलप यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.
चित्रपट कामगार आघाडीचे राष्ट्रीय महासचिव गोविंद भावे, समस्त आघाड्यांचे मार्गदर्शक मनोज कळसेकर व अमृता भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट क्षेञात काम करणाऱ्या असंघटीत कामगारांना येणाऱ्या अडचणी तसेच, कामगारांसाठी विविध योजना राबवुन चित्रपट कामगार चळवळ सक्षम करणार असल्याचे शिवराज सिन्हा यांनी सांगीतले.














