न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जून. २०२०) :- आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडून सामाजिक कार्याची प्रेरणा घेत नगरसेविका सविता नरेश खुळे यांनी आपला वाढदिवस अडचणीत सापडलेल्या सुमारे ७४० गरीब, गरजू नागरिकांना धान्य व भाजीपाला वाटप करून साजरा केला.
बळीराज मंगल कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात नगरसेविका सविता खुळे आणि नरेश खुळे यांच्या हस्ते गरीब व गरजू नागरिकांना धान्याचे व भाजीपाल्याच्या किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये पाच किलो गहू, तीन किलो तांदूळ, अर्धा किलो तेल, दोन किलो कांदे, एक किलो बटाटा, एक किलो टोमॅटो, अर्धा किलो भेंडी, अर्धा किलो शिमला मिरची, एक किलो कोबी, एक किलो फ्लॉवर, अर्धा किलो दुधी भोपळा, एक किलो वांगी व अर्धा किलो कारलं यांचा समावेश आहे.
यापूर्वीही लॉकडाऊनमध्ये आमदार लक्ष्मण जगताप, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व बळीराज मित्र मंडळ यांच्यावतीने सुमारे एक महिना सुरू केलेल्या अन्नछत्रात नगरसेविका खुळे यांनी मोलाचे सहकार्य केले होते. कार्यक्रमाचे नियोजन बळीराज मित्र मंडळ व नरेशआप्पा खुळे मित्र परिवार यांनी केले होते.














