न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जून २०२०) :- सांगवी पोलिस ठाण्यात अजब घटना घडली. ३ जून रोजी एका महिलेने फोन करून माझा भाऊ एका पुरुषासोबत पळून जाऊन प्रेमविवाह करणार आहे, असे पोलिसांना कळवले.
दोन्ही पुरुषांना पोलिसांनी पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्यांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला. दोघेही पोलिसांनाच कायद्याची भाषा सांगू लागले. पोलिसांनी शेवटी पोलिसी खाक्या दाखवून त्यांची त्यांना चूक दाखवून दिली. तसेच, दोघांनीही मुलांच्या आणि पत्नीच्या भविष्याची तरतूद करावी, मगच निर्णय घ्यावा, असे समजावले. तेव्हा दोघांनी माफी मागितली व पुढील धोका टळला.














