न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९. जून. २०२०) :- भाजयुमो पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने केंद्रातील भाजपा सरकारच्या वर्षपूर्ती आणि शिवराज्याभिषेक दिन निमित्त रक्त संकलन सप्ताह अभियाना अंतर्गत भव्य रक्तदान शिबीर राबविण्यात आले.
कोरोनाच्या संकटसमयी देशात आणि राज्यात रक्तचा प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवत आहे त्या अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने भाजपा शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे आणि आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजयुमो शहराध्यक्ष संकेत चोंधे यांचे नेतृत्वाखाली शहरात ठिक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले..
शहरातील कुदळवाडी, पिंपळेनिलख, गव्हाणे वस्ती, वाकड, यमुनानगर, प्राधिकरण, संत तुकारामनगर, चिंचवडगाव, श्रीधरनगर, इंद्रायणीनगर, रहाटणी, रावेत, चिंचवडेनगर, थेरगाव, पिंपरी येथील परिसरात हे अभियान राबवण्यात आले. कोरोनाच्या या संकट काळात देखील नागरिकांनी शिबिरास उदंड प्रतिसाद दिला. या अभियानात संपूर्ण शहरात १२२४ रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करण्यात आले..
स्थानिक भाजपा नगरसेवक, बीजेएस आणि पीएसआय, बिर्ला हॉस्पिटल, पीसीसीबी या ब्लड बँकेच्या सहकार्याने भाजयुमोचे अजित कुलथे, दिपक नागरगोजे, दिनेश यादव, देवयानी भिंगारकर, अमित गुप्ता, तेजस्विनी कदम, सुमित घाटे, प्रदीप पटेल, मुक्ता गोसावी, विक्रांत गंगावणे, शिवराज लांडगे, संकेत कुटे, अभिजित साळुंखे, प्रकाश चौधरी यांनी हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले..