न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९. जून. २०२०) :- ‘कोविड- १९ ‘ मदत कार्य म्हणून आयडीबीआय बँकेच्या वतीने बँकेचे वरिष्ठ अधिकारी संजय पानीकर आणि आशिष मिश्रा यांनी आज (दि. ९) रोजी ४० लाख रूपयांचा निधी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सुपूर्द केला.
आयुक्तांनी आयडीबीआय बँकेचे आभार मानले व हा निधी ‘कोविड १९’ प्रतिबंधात्मक आणि उपाययोजना या कामासाठी वापरला जाईल, असे नमूद केले. या प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व अजित पवार तसेच मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण उपस्थित होते.