न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९. जून. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवारी हाती आलेल्या अहवालानुसार ५६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. यात ३३ पुरुष व २३ महिलांचा समावेश आहे. आज पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील बोपोडी, जळगांव व हडपसर येथील तीन पुरुषांना कोरोनाची बाधा झालेली आहे. तसेच शहराबाहेरील जळगाव येथील एका ४५ वर्षे वयाच्या पुरुषाचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
दरम्यान शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८४३ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ३२८ रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या २० वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
आज चाचणी अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आलेले रुग्ण कस्पटे वस्ती वाकड, अजंठानगर, खंडोबामाळ भोसरी, आनंदनगर, काळभोरनगर, साईबाबानगर चिंचवड, पवारवस्ती दापोडी, पाटीलनगर चिखली, बौध्दनगर, नाणेकरचाळ पिंपरी, गुलाबनगर दापोडी, जुनी सांगवी, सिध्दार्थनगर दापोडी, बेलठीकानगर थेरगांव, वाकड, गुरुदत्त कॉलनी वाल्हेकरवाडी, नवी सांगवी, नढेनगर काळेवाडी, दिघी, विनायकनगर पिंपळे निलख, शाहूनगर चिंचवड, पिंपरीगांव, आदित्य बिर्ला कॉलनी थेरगांव येथील रहिवासी आहेत.
आज लिंकरोड पिंपरी, जुनी सांगवी, जयभवानीनगर दापोडी, इंदिरानगर चिंचवड, आनंदनगर चिंचवड, महात्मा फुलेनगर, भाटनगर, समतानगर नवी सांगवी, परंदवडी, शिरुर व आंबेगांव येथील रुग्णांना निगेटिव्ह चाचणी आल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४८१ वर पोहोचली आहे.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.