न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९. जून. २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कार्यरत औद्योगिक तथा इतर आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या क्षेत्राबाहेरील कामगार तसेच कर्मचाऱ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात प्रवेशासाठी परवानगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यासाठी [email protected] या ईमेल आयडीवर संबंधितांनी अर्ज सादर करावेत, असे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी सांगितले आहे.
मात्र संबंधित व्यक्ती प्रतिबंधित (कंटेनमेंट झोन) क्षेत्राबाहेरील असल्याचे आणि त्याचे स्वतःचे अथवा नेमणूक करणाऱ्या आस्थापनांचे वाहन उपलब्ध असल्याचे स्वयं घोषणापत्र (self declaration) या अर्जासोबत देणे आवश्यक असेल. काही अटी आणि शर्तीच्या अधीन राहून अशा स्वरूपाची परवानगी महापालिकेच्या वतीने दिली जाणार आहे.