न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून. २०२०) :- पिंपरी चौकातील कॅनरा बँक शाखेच्या एका कर्मचाऱ्याचे करोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांच्या हायरिस्क कॉन्टक्टमधील बँकेतील 15 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यातील लक्षणे असलेल्या ४ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून बँकेच्या या शाखेचे कामकाज बंद करण्यात आले आहे.
कर्मचारी पॉझिटिव्ह आलेला शहरातील पहिलीच बँक आहे. या शाखेत कार्यरत असलेल्या आणि दिघी परिसरातील रहिवासी असलेल्या कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. सोमवारपासून बँकेच्या शाखेचे कामकाज बंद करण्यात आले आहे.