- वाकड व च-होलीतील दोन वृद्धांचा आज कोरोनामुळे मृत्यू…
- शहरातील २५ रुग्ण कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. जून. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज बुधवारी हाती आलेल्या अहवालानुसार ७८ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. यात ४२ पुरुष व ३६ महिलांचा समावेश आहे. आज पिंपरी चिंचवड हद्दीतील वाकडमधील न्यु दत्तनगर येथील ८५ वर्षीय वृद्ध पुरुषाचा व च-होलीतील ६८ वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
दरम्यान शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९२१ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ३८२ रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या २० वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
आज चाचणी अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आलेले रुग्ण कस्पटे वस्ती, आनंदनगर, सद्गुरु कॉलनी वाकड, जयरामनगर सांगवी, खंडोबामाळ भोसरी, च-होली, रमाबाईनगर, विजयनगर काळेवाडी, अजंठानगर, दिघी, मोरेवस्ती चिखली, अशोकनगर चिखली, साईबाबानगर, पिंपळे सौदागर, बालाजीनगर भोसरी, नढेनगर काळेवाडी, विठ्ठुलनगर नेहरुनगर येथील रहिवासी आहेत.
आज आनंदनगर चिंचवडस्टेशन, भोसरी, दापोडी, नवी सांगवी, इंदिरानगर चिंचवड, साईबाबानगर चिंचवड, भिमनगर, भारतमाता नगर व नेहरुनगर येथील २५ रुग्णांना निगेटिव्ह चाचणी आल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५०६ वर पोहोचली आहे.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.