न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. जून. २०२०) :- पुण्यातील विमानतळ परिसरातील एक खोली भरून तब्बल दहा ते बारा कोटींच्या बनावट नोटा आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी एका जवानासह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे पोलिसांचे खंडणी विरोधी पथक आणि भारतीय लष्कराने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.
विमाननगर परिसरात पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईत दोन हजार, एक हजार, पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत. तसेच त्यामध्ये अमेरिकन बनावट डॉलरही जप्त करण्यात आले आहेत. या बनावट नोटामध्ये विशेषत : नोटा बंदीमध्ये हजारच्या नोटा व्यवहारातून बाद करण्यात आल्या असताना, त्या देखील आढळून आल्या आहेत.