न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ नोव्हें.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जैवविविधता समितीच्या अध्यक्षा उषा मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी समितीच्या सदस्या कमल घोलप, अर्चना बारणे, सुवर्णा बुर्डे, अनुराधा गोरखे तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे, पर्यावरण विभागाचे अधिकारी संजय कुलकर्णी, चंद्रकांत कोंडे, दिग्वीजय पवार आदी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या जैवविविधता व्यवस्थापन नियमानुसार महापालिकेमध्ये जैवविविधता समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्याअंतर्गत महापालिका शहरात जैवविविधतेचे सर्वेक्षण करणार आहे. त्यासाठी टेरेकॉन इकोटेक या कंपनी या सल्लागार समितीची नेमणूक करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण संपूर्ण शहर परिसरात जानेवारी २०१९ च्या आधी पूर्ण करायचा असून त्याद्वारे शहरातील जैवविविधतेची सद्य स्थिती व त्यासाठी आवश्यक उपाय योजनांचा अहवाल तयार केला जाणार आहे.
















