न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १९ नोव्हें) :- पिंपळे सौदागर येथील एआयएस ड्रीम्ज स्केटिंग क्लब आणि उडान स्केटिंग क्लबच्या खेळाडूंनी ४८ तास रिले स्केटिंग करून गिनीज बुक मध्ये विश्वविक्रम नोंदविण्यासाठी प्रदर्शनीय खेळ केला.
बेळगांव येथील शिवगंगा इंटरनॅशनल रिंकवर घेण्यात आलेल्या या स्केटिंग स्पर्धेत देशभरातून सहाशे खेळाडू सहभागी झाले होते. ४८ तासाचा रिले स्केटिंग रेकॉर्ड ११ नोव्हेंबरला संध्याकाळी ६ :४० वा सुरुवात होवून १३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५:४५ वा पूर्ण झाला. या ४८ तासात सहाशे खेळाडूंनी ६ हजार लॅप पूर्ण केले. एआयएस ड्रीम्ज स्केटिंग आणि उडान क्लबचे युग काकडीया (वय १३), आदिनाथ लोखंडे ( वय ५), रेहांश द्वीवेदी (वय ८), तनिष राऊत (वय ११), अर्णव वामनाचारी (वय १४), रोहन ( वय १४) यांनी प्रदर्शनिय स्केटिंग सादर केले.
या खेळाडूंना प्रशिक्षक वैभव बिळगी, राहुल बिळगी, वंदना बिळगी, राजू बोर्डे यांचे मार्गदर्शन लाभले.
















