न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी (दि. १९ नोव्हें) :- पुणे जिल्हयाचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पुणे जिल्ह्याच्या महसूल विभागाच्या आस्थापनावरील असलेल्या, नायब तहसीलदारांच्या नुकत्याच बदल्या केल्या असून, आकुर्डीच्या अप्पर तहसील कार्यालयाच्या नायब तहसीलदारपदी विकी परदेशी यांची निवड करण्यात आली आहे.
परदेशी हे पुण्याच्या उपविभागीय कार्यालयात नायब तहसीलदारपदी कार्यरत होते. त्यांनी सोमवार (दि. १९) रोजी हवेली (आकुर्डी) विभागाचा नायब तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
















