न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरात कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांना कोठेही न धुंकण्याचे आवाहन महापालिकेकडून वारंवार केले जात आहे. मात्र, नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. त्या अनुषंगाने डांगे चौक येथे थुंकल्याप्रकरणी १०० जणांवर कारवाई करत महापालिकेने त्यांच्याकडून १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
ही कारवाई क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे, सहायक आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य आरोग्य निरीक्षक राजू बेद यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक एस. बी. चन्नाल, दिलीप खताळ, अभय दारोळे, प्रशांत पवार, अरुण राऊत, राजू जगताप, सूर्यकांत चाबुकस्वार, वजीर सौदागर यांच्या पथकाने केली.