- जुनी सांगवी व अजंठानगरमधिल दोघांचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. जून २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज
मंगळवारी (दि. २३) रोजी १७१ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
आज मृत झालेले रुग्ण पवारनगर जुनी सांगवी (पुरुष, वय- ७२ वर्षें), अजंठानगर चिंचवड (पुरुष, वय- ४७ वर्षें), कोथरुड पुणे (स्त्री, वय- ४७ वर्षें) येथील रहिवासी आहे.
दरम्यान शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २०३४ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ७९२ रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण ३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण नढेनगर काळेवाडी, सिध्दार्थनगर दापोडी, नेहरुनगर, पिंपरी, साईबाबानगर चिंचवड, दापोडी, काटे पिंपळे रोड पिंपळेगुरव, आनंदनगर चिंचवड, सानेवस्ती चिखली, शास्त्रीचौक भोसरी, इंद्रायणीनगर भोसरी, नंदादिप कॉलनी काळेवाडी, पवारनगर जुनी सांगवी, सुदर्शननगर पिंपळे गुरव, नखातेनगर थेरगांव, बौध्दनगर पिंपरी, बिजलीनगर चिंचवड, विठ्ठलनगर पिंपरी, पिंपरगांव, गांधीनगर पिंपरी, नेहरुचौक दापोडी, भाटनगर पिंपरी, साईचौक बोपखेल, लिंकरोड पिंपरी, कासारवाडी, अंकुशचौक निगडी, वैदुवस्ती पिंपळेगुरव, तापकिरनगर काळेवाडी, दिघीरोड भोसरी, फिनोलेक्स कॉलनी काळेवाडी, इंदिरानगर, भारतमाताचौक काळेवाडी, गवळीनगर भोसरी, मोरवाडी, माऊलीचौक वाकड, बौध्दनगर पिंपरी, रामनगर राहाटणी, कैलासनगर थेरगांव, ऍटलस कॉलनी नेहरुनगर, मोरेवस्ती निगडी, स्वामी समर्थ कॉलनी थेरगांव, वाल्हेकरवाडी, विठ्ठलमंदिर बोपखेल, पाटीलनगर चिखली, मिलिंदनगर पिंपरी, भारतमातानगर दिघी, महात्माफुलेनगर भोसरी, किनार हॉटेल दापोडी, कन्हयापार्क थेरगांव, नानेकरचौक चिखली, पवारवस्ती दापोडी, लोंढेचाळ पिंपरी, नखातेनगर रहाटणी, राजीवगांधी वसाहत नेहरुनगर, आझादचौक निगडी,मुंजोबावसाहत चिंचवड,कामगारनगर पिंपरी, पवारनगर सांगवी, फकिरा घुले चाळ बोपखेल, जवळकरचाळ कासारवाडी, संतगजानन महाराज नगर दिघी, जयभवानी नगर पिंपळेगुरव, चक्रपाणी वसाहत भोसरी, आदर्शनगर ताथवडे, लिंबोरेवस्ती दापोडी, गणेशखिंड, वारजे माळवाडी, बोपोडी, टिंगरेनगर विश्रांतवाडी, रास्तापेठ पुणे, खडकी, औंध, कसबापेठ, दौंड येथील रहिवासी आहेत.
आज नानेकरचाळ पिंपरी, साईबाबानगर चिंचवड, निगडी, यमुनानगर, रावेत, आनंदनगर, बेलटिकानगर थेरगांव, शिवतीर्थनगर काळेवाडी, जयभीमनगर दापोडी, बौध्दनगर पिंपरी, काळेवाडी, रमाबाईनगर पिंपरी, केशवनगर चिंचवड, शाहूनगर, भाटनगर पिंपरी, सिध्दार्थनगर दापोडी, अजंठानगर, भारतनगर पिंपरी, स्वीसकॉन्टी थेरगांव, पाटीलनगर चिखली, जयमालानगर जुनी सांगवी, विठ्ठलनगर, खंडोबामंदिर चिंचवड, आदर्शनगर किवळे, इंदिरानगर चिंचवड, पवारवस्ती दापोडी, दत्तनगर दिघी, प्रियदर्शनीनगर सांगवी, सिंधुनगर, रमाबाईनगर पिंपरी, फुगेनिवास कासारवाडी, ऐश्वर्यम चिखली, मयुर पॅनोरामा नेहरुनगर, सेक्टर २२ यमुनानगर, जयभीमनगर दापोडी, जाधवचाळ दापोडी, मोरवाडी, रावेत, गवळीनगर भोसरी, भिमाशंकरनगर दिघी, लिंबोरेवस्ती दापोडी, पीसीएमसी बिल्डींग निगडी, जळगांव, पेठ, देहूरोड, खेड, येरवडा, हडपसर, वडगांव, कोंढवा येथील रहिवासी असलेले रूग्ण ‘कोरोनामुक्त’ झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पावसाळा सुरु झालेला असल्याने वैद्यकीय विभाग, पिं.चिं. मनपामार्फत सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत की अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच पावसाचे पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी घ्यावी व सोबत किमान ०१ तरी अतिरीक्त (Extra) मास्क ठेवावा.