न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 23. जून. 2020) :- पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी कॅम्पातील बाजारपेठीतील दुकाने , ग्राहक यांच्याकडून अटी – शर्तीचे उल्लंघन केले जात आहे . सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही . फेस मास्कचा वापर केला जात नाही . सम – विषम तारखेच्या नियमाचे उल्लंघन होत आहे . त्यामुळे पिंपरी बाजारपेठ आजपासून दोन दिवस म्हणजेच गुरुवारपर्यंत पुन्हा बंद ठेवण्यात येणार आहे .
याबाबतची माहिती महापालिकेने दिली आहे . पिंपरी कॅम्प परिसरातील मुख्य बाजारपेठ , शगुन चौक , कराची चौक , साई चौक , आर्य समाज चौक , गेलार्ड चौक , डिलक्स चौक , संत गाडगे महाराज चौक या परिसरातील बाजारपेठ आजपासून 25 जून 2020 पर्यंत बंद ठेवण्यात आली आहे , असा आदेश महापालिका ‘ ग ‘ क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे यांनी काढला आहे.
सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे , सम – विषम तारखेनुसार दुकाने सुरू ठेवावे , गर्दी टाळावी या अटीनुसार पिंपरी कॅम्पातील दुकाने उघडण्यास महापालिकेने परवानगी दिली होती.