न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 24. जून. 2020) :- चिखली कुदळवाडी परिसरातील नागरिकांना मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांचे लाइटबिल रिडिंग प्रमाणे द्यावे त्यात कसलाही इतर अधिभार लाऊ नये, अशी मागणी प्रभागाचे सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावाने आधीच नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. आजही गोरगरीब कामगारांच्या हाताला काम नाही तरी आपण त्यांना सवलत द्यावी, असे महावितरण कंपनीला विनंती पूर्वक निवेदन दिनांक २३ जून रोजी दिले आहे.
अचानक जून महिन्यात वीज बिल रेडींग घेणे चालू केल्यामुळे वीज बिल आता भरमसाठ येणार असून ते योग्य पद्धतीने रिडिंग घेणे आणि बिल देणे. ज्या नागरिकांनी या काळात ऑनलाइन बिल भरले आहेत अशा नागरिकांचे बिल वजा करून त्यांना बिल देण्यात यावे. पुढील बिल भरण्याकरता गोरगरीब जनतेला मुदतवाढ व सवलत देण्यात यावी अशा विनंतीचे निवेदन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी महावितरण च्या भोसरी विभागाला दिलेले आहे. यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी योग्य विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. जर भरमसाट बिले देण्यात आली तर त्याचा त्रास महावितरणला होणार आहे असेही यादव म्हणाले.
त्यामुळे मार्च, एप्रिल, मे मधील विजेचे रिडींग योग्य पद्धतीने घेऊन तेवढेच बिल देण्यात यावे व त्यामध्ये सवलत देण्यात यावी, असे दिनेश यादव यांनी निवेदनात म्हटले आहे.