- माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकिर यांची टिका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 24. जून. 2020) :- भाजपचे नवनियुक्त आमदार गोपीचंद पडळकर यांचा राजकीय प्रवास महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे . धनगर समाजाचे स्वयंघोषित नेते म्हणविनाऱ्या पडळकर यांची अवस्था बिकट झाली आहे . भाजपच्या दारातील श्वान बनलेल्या पडळकरांनी राष्ट्रवादी काग्रेसच्या नेत्यांवर विनाकारण भुंकू नये अशी जळजळीत टीका पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मछिंन्द्र तापकीर यांनी केली आहे .
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार साहेबांबाबत हीन पातळीवर टीका केली . त्या विरोधात मछिंन्द्र तापकीर यांनी पत्रक काढत खरपुस समाचार घेतला आहे .
पत्रकात तापकीर म्हणतात , आज जे वक्तव्य केलेले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. गोपीचंद पडवळकर यांचे जेवढे वय असेल त्याहून अधिक वर्षे पवार साहेबांनी महाराष्ट्राला दिली आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय नेते पवार साहेब यांच्या संदर्भांत अतिशय हिन शब्दात वक्तव्य केले आहे.
राजकारणात मतभेद असू शकतात मात्र एखाद्या व्यक्ती बद्दल इतक्या खालच्या पातळीवर येऊन वक्तव्य करणे भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीला शोभत नाही. ज्यांचे विधान सभेमध्ये ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले त्यांनी पवार साहेबांविषयी बोलणे योग्य नव्हे आपण थोड साभांळून बोलावे, भविष्य सांगणा-या पोपटासारखे बोलू नये. पडळकरांची ती कुवत नाही. पवार साहेबांचे नाव सर्वच पक्षातील जेष्ठ नेतेही आदराने घेतात. वेळ प्रसंगी त्यांच्याशी सल्लामसलत करतात. हे पडळकरांना माहित नसावे त्यामुळे त्यांनी असे बेताल वक्तव्य पवार साहेबांच्या बाबतीत केले आहे.
त्यामुळे पवार साहेबांविषयी तुमची बोलण्याची कुवत नाही. हे आपण लक्षात घ्यावे व येथून पुढे साहेबांच्याबाबत अपशब्द काढल्यास राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आपणांस योग्य उत्तर देतील हे लक्षात ठेवावे, असा ईशाराही देण्यात आला आहे .


















