न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, सह शहर अभियंता रामदास तांबे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.