न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जुलै. २०२०) :- करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रस्त्यावर धुंकणारे नागरिक आणि फेसमास्क न बांधणाऱ्या नागरिकांकडून महापालिकेने गेल्या अडीच महिन्यांमध्ये तब्बल ११ लाख रुपये दंडापोटी वसूल केले आहेत. महापालिका प्रशासनाने २३ एप्रिलपासून ही दंडवसुली सुरू केली.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय धुंकीबहाद्दरांकडून प्रत्येकी १५० रुपये याप्रमाणे २२५४ जणांकडून ३ लाख ३८ हजार १०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. तर, मास्क न वापरणाऱ्या १ हजार ५४३ जणांकडून प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे ७ लाख ७१ हजार ५०० रुपये इतका दंड वसूल केला.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय चौकाचौकांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत पोलिसांच्या मदतीने ही दंड वसुली करण्यात आली आहे, अशी माहिती प्रभारी आरोग्य कार्यकारी अधिकारी विनोद बेंडाळे यांनी दिली.


















