न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एकाच दिवशी २७ पोलीस करोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यातील ११ जण हे पिंपरी पोलीस ठाण्यातील होते. मात्र रात्री उशिरा आलेल्या माहितीमध्ये पिंपरी पोलीस ठाण्यातील एकही कर्मचारी बाधित नसल्याचे समोर आले.
रात्री उशिरा पुन्हा महापालिकेने ते ११ कर्मचारी बाधित नसल्याचे कळविले. त्यामुळे महापालिकेच्या या गलथान कारभाराचा मनस्ताप पोलिसांना करावा लागला. महापालिका प्रशासनाचा हा सावळा गोंधळ पाहता संभाव्य धोका टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने या ११ कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या संपर्कात ना आलेल्या इतर सर्व कर्मचाऱ्यांची करोनाचे चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. आता या सर्वांची चाचणी पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात करण्यात येणार आहे.















