न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ नोव्हें) :- चिंचवड येथील एम्पायर इस्टेट पुलाखाली रेल्वे लाईनच्या बाजूला कचरा गोळा करणारी महिला कचरा गोळा करीत होती. कचरा गोळा करीत असताना तिचे लाल रंगाच्या पिशवीकडे लक्ष गेले, त्यात तिला जिवंत काडतुसे सापडली आहेत.
संबंधित विषयाची महिलेने तात्काळ पिंपरी पोलिसांना माहिती दिली. पिंपरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सर्व काडतुसे हस्तगत केली आहेत. यात तीन प्रकारची काडतुसे आहेत. कडतुसांची विल्हेवाट लावण्यासाठी ही काडतुसे टाकली असल्याचा, संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
















