न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अस्थापनेवर कार्यरत असलेले ३ पोलीस अधिकारी यांना सलग दोन वर्षे नक्षलवाद्याविरुध्द केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल केद्रिय गृह विभाग, भारत सरकार तर्फे देण्यात येणारे आंतरिक सुरक्षा सेवापदक जाहीर झाले. या निमित्त बुधवारी (दि. २९) रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रागंणात पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड संदीप बिष्णोई यांच्या हस्ते सर्व पदक विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
या विजेत्यांमध्ये अभिजीत मधुकर जाधव (सहायक पोलीस निरीक्षक) चिंचवड पोलीस ठाणे, तानाजी शंकर भोगम (सहायक पोलीस निरीक्षक) वाकड पोलीस ठाणे, नारायन आश्रुबा मिसाळ (सहायक पोलीस निरीक्षक) भोसरी वाहतुक विभाग या अधिका-यांचा समावेश आहे.
सर्व पदक विजेते अधिकारी हे सन २०१० ची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येण्यारी पोलीस उप – निरीक्षक ही परीक्षा पास होवुन महाराष्ट्र पोलीस दलात रुजु झाले असुन त्यांनी ऑक्टोबर २०११ ते ऑगष्ट २०१४ अशी सलग दोन वर्षे गडचिरोली जिल्ह्यात भामरागड , मुलचरा व चामोर्शि या नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्याविरुध्द उल्लेखनिय कामगिरी केली आहे. त्यांना केंद्रीय गृह विभाग, भारत सरकार यांच्यामार्फत सन २०१५ मध्ये हे आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर झाले होते.
बक्षिस प्रदान कार्यक्रम प्रसंगी संदीप बिष्णोई म्हणाले, सर्व पदक विजेत्या अधिकारी यांचे अभिनंदन. यापुढेही आपण सर्वजण अशीच उत्तम कामगीरी करुन पोलीस दलाचे नाव उंचवावे, पोलीस दलात उत्कृष्ठ कार्य करुन पुढे जावुन राष्ट्रपती पदक मिळवण्याचा प्रयत्न करावा, असे गौरवोद्गार काढुन त्यांचे कौतुक केले.
याप्रसंगी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांचेसह अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे व पोलीस उप-आयुक्त, गुन्हे सुधीर हिरेमठ यांनी देखील पदक विजेत्यांचे कौतुक करुन मार्गदर्शन केले. या छोटेखानी कार्यक्रमप्रसंगी सोशल डिस्टन्सींगचे तंतोतंत पालन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. राखीव पोलीस निरीक्षक राजकुमार माने यांनी केले.