न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हें) :- रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे त्यांना सामाजिक सुरक्षा आरोग्य विमा, म्हातारपणी पेंशन मिळावी, बेकायदेशीर वाहतूक बंद करावी, ओला उंबर या कंपन्यांवर बंदी आणावी, रिक्षा चालकांसाठी घरकुल योजना राबवावी, इन्शुरन्सचे वाढलेले दर कमी करावेत, यासह इतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतिच्यावतीने (दि. २७) रोजी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष, कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात पंचायत शहर अध्यक्ष सोमनाथ कलाटे, दत्त भोसले, गोकुळ रावलकर, दिलीप साळवे, लखन लोंढे, जेकब मेथ्यव, नवनाथ लोखंडे, सुदाम बनसोड, अरविंद काळे, बाळासाहेब सोनवणे आदी उपस्थित होते.
यावेळी बाबा कांबळे म्हणाले, रिक्षा व्यवसाय मोडीत काढण्याचा सरकारचा डाव आहे, नवीन नियम आणि जाचक अटीमुळे रिक्षा चालकांचे जगणे मुश्किल झाले आहे. सरकारने रिक्षा चालकांचे प्रश्न न सोडविल्यास रिक्षा चालकांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण होईल हे राज्यकर्त्यांनी हे लक्षात घ्यावे, असे बाबा कांबळे म्हणाले. ‘कल्याणकारी मंडळ झालेच पाहिजे, आम्हाला पेंशन मिळालीच पाहिजे’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.










