पिंपरी (दि. २९ नोव्हें) :- ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने मंगळवार (दि. २७) रोजी महाराष्ट्रातील सर्व आर. टी. ओ. कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. यात पुणे, सांगली, कोल्हापूर, कराड, लातूर, नांदेड, बीड, नवीमुंबई, कल्याण, डोंबिवली, पनवेल, नागपूर, चंद्रपूर आदी ठिकाणचा समावेश होता.
जळगावसह महाराष्ट्रातील सर्व आर. टी. ओ. कार्यालयात रिक्षा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली असून, रिक्षा चालकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर चर्चा कारण्यासाठी (बांद्रा) मुंबई येथील परिवहन आयुक्त कार्यालयात शुक्रवार दि. ३० रोजी संयुक्त कृती समिती पदाधिकारी आणि रिक्षा संघटना नेते, प्रतिनिधी बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीस महाराष्ट्रातील रिक्षा संघटना प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन कृती समिती सरचिटणीस बाबा कांबळे यांनी केले आहे. रिक्षा चालकांच्या आंदोलनाची तातडीने दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून, रिक्षा चालकांचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा बाबा कांबळे यांनी व्यक्त केली
















