- रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२०) :- पुणे व पिंपरी – चिंचवड शहरातून सुमारे दीड हजार प्रवसी दररोज मुंबईकडे कामानिमित्त प्रवास करतात. यात अनेक पास धारक प्रवाशांचा सहभाग आहे. शासनाच्या नव्या धोरणानुसार कामाच्या वेळात व उपस्थितित बदल झाला आहे. रेल्वे सेवा बंद असल्याने याचा सर्वाधिक त्रास नोकरदार वर्गाला होत आहे. पुण्याकडून मुंबईला जाण्यासाठी कामाच्या वेळेत एक्स्प्रेस गाडी व पुणे लोणावळा लोकलच्या काही फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेकडून होत आहे.
पुणे – मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मार्च महिन्यापासून रेल्वे प्रवास बंद झाला आहे. लॉकडाऊन काळात सुट्टया असल्याने अडचणी जाणवल्या नाही. मात्र आता अनलॉक पद्धतीत कामे सुरू झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. मुंबईकडे जाणाऱ्या कामगार वर्गाला चारचाकी व दुचाकी वरून प्रवास करावा लागत आहे. हिच परिस्थिती लोणावळा ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांची झाली आहे. रोजच्या प्रवासात होणारा खर्च, पावसामुळे येणाऱ्या अडचणी पाहता हा प्रवास धोकादायक व त्रासदायक ठरत आहे. मुंबईकडे जाण्यासाठी सरकारी कामाच्या वेळा विचारात घेऊन पुणे मुंबईसाठी एक गाडीची व्यवस्था करावी. तसेच पुणे – लोणावळा या मार्गावर लोकल सुविधा अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी व नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी सुरु करावी, अशी मागणी पिंपरी – चिंचवड रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
संघाचे अध्यक्ष ईक्बाल मुलाणी व उपाध्यक्ष शैलेंद्र पांडेय यांनी रेल्वे प्रवाशांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे या बाबत पत्रव्यवहार व चर्चा केले आहे. नियमित प्रवास करणाऱ्या पास धारक व प्रवाशांना असणाऱ्या अडचणी विचारात घेऊन गाइयांची व्यवस्था करावी, अशी संघटनेची मागणी आहे. येणाऱ्या अडचणी पाहता हा प्रवास धोकादायक व त्रासदायक ठरत आहे. मुंबईकडे जाण्यासाठी सरकारी कामाच्या वेळा विचारात घेऊन पुणे-मुंबईसाठी एक गाडीची व्यवस्था करावी. तसेच पुणे – लोणावळा या मार्गावर लोकल सुविधा अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी व नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी सुरु करावी, अशी मागणी पिंपरी – चिंचवड रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने करण्यात येत आहे.














