न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे गुरव (दि. ३० नोव्हें.) :- पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समितीच्या वतीने गरीब मुला-मुलींच्या वस्ती शाळेत महात्मा फुले यांची १२४ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. वक्ते म्हणून प्रा. संपत गर्जे यांनी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, महात्मा फुले हे सामाजिक क्रांतीची मशाल पेटवणारे महाराष्ट्रातील एक कृतीशील थोर समाजसुधारक व क्रांतिकारक विचारवंत होते. समाजजीवनातील पारंपरिक जुन्या चालीरीती, वर्णव्यवस्था व गुलामगिरी यांच्याविरुद्ध त्यांनी आयुष्यभर लढा दिला. सत्यशोधक समाजाची स्थापना करुन त्यांनी सार्वजनिक सत्यधर्माची कल्पना समाजाला समजावून सांगितली. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणाचे कार्य अनमोल आहे. शेतकरी, शेतमजूर इत्यादींच्या जीर्णोध्दारांच्या कार्यासाठी या उभयतांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनी रचला.
याप्रसंगी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, नगरसेवक गोपाळ माळेकर, सामाजिक कार्यकर्ते वामन भरगंडे, सूर्यकांत कुरुलकर, दत्तात्रय धोंडगे, शिवाजी सुतार, नवेश पाटील, बाळासाहेब साळुंके, अभिमन्यु गाडेकर, माधव मनोरे, मारुती बानेवार, विजय देवकर, संपत गर्जे, सखाराम जोशी, दिनेश गाडेकर, कृष्णाजी खडसे, श्री. कुंदे सर, श्रीनिवास पानसरे, सुनील शिंदे, नामदेव गुट्टे, राजेश गाटे, गोटके व्ही.एल, बाळासाहेब चितळकर, नारायण वळसे, शंकर तांबे, चव्हाण पी.एल, पी. जी. तोरवणे आदी उपस्थित होते.
















