न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हें) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील व शहराबाहेरील नागरिकांना उपनगर व परिसराची माहिती व्हावी यासाठी प्रत्येक चौकात वाहतुक दिशादर्शक फलक लावलेली आहेत.
ताथवडे येथील दिशादर्शक फलक मोडकळीस आला असून, कोणत्याही क्षणी या दिशादर्शकाचा काही भाग वाहनचालकांच्या वाहनावर अथवा वाहन चालकांच्या अंगावर पडून मोठा अपघात होण्याची शक्यता असून, हा दिशादर्शक फलक तातडीने दुरूस्त करण्याची मागणी शहरातील वाहतूक व राजकीय संघटनांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.










