न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. ३० नोव्हें) :- निगडीतील विद्यानंद भवन हायस्कुल च्यावतीने शाळेतील विद्यार्थ्यांकरीता बालजत्रा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी बालजत्रेचा आनंद लुटला. सुंदर नियोजनामुळे शाळा परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. या बालजत्रेचे आयोजन माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका छाया हब्बू व प्रीती शिंदे यांनी केले होते.
यावेळी सच्चिदानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भरत चव्हाण पाटील, विश्वस्त डॉ जे जी पाटील, सुप्रिया चव्हाण पाटील यांच्या हस्ते या बाल मेळाव्याचे उदघाटन झाले.
या मेळाव्यात मेरी गो राऊंड, घोडेस्वारी, उंटस्वारी, विविध पाळणे, छोटी रेल्वे, जम्पिंग टॉवर्स या सारख्या खेळामध्ये मुले रमून गेली. अनेक खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर मुलांनी गर्दी केली. यावेळी पालक व विद्यार्थ्यांनी खाद्य पदार्थावर ताव मारला. प्राथमिक, माध्यमिकच्या विद्यार्थी व पालकांनी या बालजत्रेचा आनंद घेतला. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पिका सविता किरंगे, योगेश जाधव, योगेश देवळे, मिलिंद जंगले, साहेबराव जाधव यांनी नियोजन केले होते










