न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ३० नोव्हें.):- पिंपळे सौदागर येथील एच. बी. पी. पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित, पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये क्रांतिसूर्य समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांच्या हस्ते ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.
महात्मा फुलेंनी रचलेल्या विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली। नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले। वित्तविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले। या विद्येचे महत्व पटवून देणाऱ्या ओव्यांचा अर्थ शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली जुगुळकर यांनी विद्यार्थ्यांना सहज, सोप्या भाषेत समजावून सांगितला. यावेळी विद्यार्थ्यांनी देखील महात्मा फुलेंच्या जीवनाबद्दल माहिती सांगितली.
कार्यक्रमास शाळेच्या पर्यवेक्षिका संगीता पराळे, सविता आंबेकर, सर्व शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुनीता मजूकर यांनी मानले.