न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२०) :- पिंपळे निलख ( विशाल नगर ) येथील श्री साई मंदिराचा तिसरा वर्धापन दिन सामाजिक कार्य करून साजरा करण्यात आला. करोना संसर्ग आजाराच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टनसिंग ‘ व आरोग्यविषयक सर्व नियम पाळून सार्वजनिक सर्व कार्यक्रम केला.
समाजाच्या हितासाठी व खरोखर लॉकडाऊनमध्ये ज्यांच्या दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्या अशा मातृसेवा वृद्धाश्रम ‘ बिजलीनगर येथील वृद्धांना दोन महिने पुरेल एवढे सॅनिटरी डायपर तसेच पाच हजार रुपये देणगी तसेच भीमसार अनाथ मुलांची शाळा ‘ वाकड येथील मुलांना स्वयंरोजगारासाठी संस्थेच्या वतीने शिलाई मशीन मदत म्हणून मोफत देण्यात आले.
या वेळी अध्यक्ष संदीप बोडके, खजिनदार चंद्रकांत ववले, भरत इंगवले, उद्धव भांबरे, प्रमोद झुंजारराव, चंद्रकांत दोकर, आनंदा दौंडकर, जयश्री कामठे आदी उपस्थित होते.
















