- आज २२० जणांना कोरोनाची बाधा; तर २२२ रुग्णांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. १ डिसेंबर) रोजी २२० जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९२५५१ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८८५७९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १६३८ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील यापुर्वी मृत झालेले रुग्ण परंतु आज माहिती प्राप्त झालेले हे ०७ पुरुष – चिंचवड (६१ वर्षे), निगडी (५९ वर्ष), पिंपळे गुरव (६५ वर्षे), रहाटणी (६३ वर्षे), पिंपरी (६० वर्षे), संत तुकारामनगर (९० वर्षे), भोसरी (९० वर्षे) ०२ स्त्री चिंचवड (५० वर्षे), भोसरी (६० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात यापूर्वी मृत झालेले रुग्ण तसेच आज माहिती प्राप्त झालेले ०१ पुरुष रुग्ण रासे (८६ वर्षे), ०१ स्त्री जुन्नर (७५ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील मागिल २४ तासात कोविड -१९ आजाराने मृत्यु झालेले रुग्ण संख्या ०० एवढी आहे. तसेच या पुर्वी झालेल्या ०९ मृत्युंची माहिती आज प्राप्त झाल्यामुळे अपडेट केली आहे.