न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. ८ डिसेंबर) रोजी १३२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे ६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९३६४७ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८९८९८ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १६७१ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – संत तुकाराम नगर पिंपरी (५७ वर्षे), दापोडी (५० वर्षे) ०१ स्त्री – काळेवाडी (५५ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष – हडपसर (७५ वर्षे), जुन्नर (८० वर्षे), धोलवड (६२ वर्षे) येथील रहिवासी आहेत.















