- वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२०) :- जलनिस्सारण वाहिनी काम करण्यात येत असल्याने पिंपरीतील मुख्य बाजारपेठ येथील आर्य समाज चौक ते डिलक्स मॉल दरम्यानच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
बुधवारपासून (दि. १६) दोन आठवड्यांसाठी हा बदल केला आहे. त्यानुसार या मार्गावरील शगुन चौक ते डिलक्स चौक – काळेवाडीकडे जाणारी लेन बंद करण्यात आली आहे.
शगुन चौकातून साई चौक मार्गे जमतानी चौक ते काळेवाडी पुलाकडे वाहनचालकांना जाता येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले आहे.














