- सुरक्षा, लेखा, नगर सचिव, प्रशासन विभागातील ११० जणांना पदोन्नत्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२०) :- कोरोनाच्या कालखंडात महापालिकेतील वर्ग एक ते तीनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रलंबित असणाऱ्या पदोन्नती दिल्या आहेत.
सुरक्षा, लेखा, नगर सचिव, प्रशासन विभागातील ११० जणांचा समावेश आहे. सुरक्षा अधिकारी उदय जरांडे यांना वर्ग एकचे मुख्य सुरक्षा अधिकारीपदी पदोन्नती दिली आहे. तर सहायक सुरक्षा अधिकारी विलास सावळे यांना वर्ग दोनच्या सुरक्षा अधिकारीपदी पदोन्नती दिली आहे.
लघुलेखक वैशाली गायकवाड यांना उच्चस्तर लघुलेखक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच कार्यालयीन अधीक्षक मुकेश कोळप, श्रीकांत कोळप, राजेश ठाकर यांना प्रशासन अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच उच्च लिपिक आठ जणांना कार्यालयीन अधीक्षक तर, लिपिक असणाऱ्या ७० जणांना मुख्य लिपिक, १५ लिपिकांना उपलेखापाल म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.














