पालिकेची निविदा भरण्यास तीन वर्ष प्रतिबंध; फौजदारी कारवाई करण्याचीही शक्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य, उद्यान, बीआरटीएस, ईडब्लूएस प्रकल्पातील १०७ कामांमध्ये PSD (पर्फोर्मंस सेक्युरीटी डिपॉझिट) आणि FDR (फिक्स डिपॉझिट रिसीट) बोगस आढळून आले आहेत. त्यातील १८ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश स्थायी समितीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले होते.
त्यानंतर प्रशासनाने हालचाली करत कारवाई सुरु केली आहे. काळ्यात यादीत टाकले जाणा-या ठेकेदारांची नावे दिली आहेत. त्यांना पालिकेची निविदा भरण्यास तीन वर्ष प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यांच्यावर फौजदारी कारवाई देखील केली जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
यात श्री दत्त कृपा एंटरप्रायजेस, सोपान जनार्दन घोडके, दीप एंटरप्रायजेस, बीके खोसे, बीके कन्स्ट्रक्शन अॅण्ड इंजिनिअरिंग, एचए भोसले. भैरवनाथ कन्सट्रक्शन, कृती कन्स्ट्रक्शन, डीजे एंटरप्रायजेस, म्हाळसा कन्सट्रक्शन प्रा. लि., अतुल आरएमसी, पाटील अण्ड असोसिएट, डीडी कन्स्ट्रक्शन, एसबी सवाई, चैतन्य एंटरप्रायजेस, वैदही कन्स्ट्रक्शन, त्रिमुर्ती कन्स्ट्रक्शन आणि राधिका कन्स्ट्रक्शन या ठेकेदारांचा समावेश आहे.















