न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०२०) :- महापालिकेच्या नागरवस्ती विभागातील दिव्यांग कक्षाला सहायक आयुक्त मिळावे, अशी मागणी विविध संस्थांनी केली होती. त्यानुसार दिव्यांग कक्षाला सहायक आयुक्त म्हणून अण्णा बोदडे यांची नियुक्ती केली आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरवस्ती विभागाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. तसेच या विभागा अंर्तगत दिव्यांग कक्षही सुरू केला आहे. या कक्षाला सहायक आयुक्त नेमावा, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाने केली होती.















